कोरोना रुग्णांचे घरात राहणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:06+5:302021-05-26T04:26:06+5:30

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे घरात राहणे आता ...

Corona patients stay at home | कोरोना रुग्णांचे घरात राहणे बंद

कोरोना रुग्णांचे घरात राहणे बंद

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे घरात राहणे आता बंद करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्यावर्षी शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे रुग्ण घरात ठेवण्यापेक्षा तातडीने संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठवला जात असे. महापालिकेपासून ग्रामपंचायतींपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी हिरिरीने पुढे आल्या होत्या. शहरात नगरसेवकही या सर्व कामात अग्रेसर होते; परंतु दुसऱ्या लाटेवेळी मात्र शहरातील अनेकजण माजी नगरसेवक झाल्याने अनेकजण सध्या बकफुटवर आहेत. ग्रामीण भागातील या कामासाठी फारसा कोणी पुढाकार घेतलेला नाही. माणगावसारख्या अपवादात्मक काही ग्रामपंचायती सक्रिय झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पंधरा दिवसांपूर्वीच याबाबत सविस्तर सूचना देऊन ग्रामसमित्या सक्रिय करण्याचे आदेश दिले होते; परंतु तरीही अजून परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. कॉन्टक्ट ट्रेसिंग, जवळच्या नातेवाइकांसह संपर्कातील सर्वांना स्वॅबसाठी नेणे, लक्षणे असणाऱ्यांना, बाहेरून आलेल्यांना शाळेमध्ये ठेवण्यापासून अनेक निर्णय तातडीने घेण्यात आले आणि राबवलेही गेले. मात्र, दुसऱ्या लाटेवेळी प्रभाग समित्या आणि ग्रामसमित्या प्रशासनाला दाद देत नसल्याचे चित्र आहे. यामध्ये संस्थात्मक विलगीकरणाचा खर्च कुणी करायचा हाच कळीचा मुद्दा होता; परंतु ग्रामविकास विभागाने याबाबत परिपत्रक काढून पंधराव्या वित्त आयोगातून खर्च करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे फरक पडण्याची शक्यता आहे.

चौकट

शहरातील गृहअलगीकरणातील रुग्ण २०१४

ग्रामीण भागातील गृहअलगीकरणातील रुग्ण ४२४९

एकूण ६२६३

चौकट

जिल्ह्यातील रुग्णालये

कोविड समर्पित रुग्णालये १२समर्पित

कोविड केंद्रे ९३

कोविड काळजी केंद्रे ८३

कोट

गेल्या महिन्याभरापासून गृहअलगीकरणामध्ये कोरोना रुग्ण ठेवण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण आवश्यक असल्याचा आम्ही आग्रह धरत आहोत. कोल्हापुरात आलेल्या टास्क फोर्सनेहीही सूचना केली होती. शासनानेही आता अशा पद्धतीच्या सूचना आभासी बैठकीमध्ये दिल्या आहेत.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Corona patients stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.