कोरोनाकाळात डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:23 AM2020-12-31T04:23:32+5:302020-12-31T04:23:32+5:30

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने कोविड-१९ महामारीच्या काळात ...

In the Corona period d. Y. The work of Patil Hospital is remarkable | कोरोनाकाळात डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय

कोरोनाकाळात डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय

googlenewsNext

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने कोविड-१९ महामारीच्या काळात केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. संस्थेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपासून परिचारिकेपर्यंत सर्वांनी या सेवाकार्यात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. या महासंकटाच्या काळात रुग्णालयाने सरकारी यंत्रणेला मदतीचा हात देत आपल्या कार्यातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा (पी.पी.पी.) आदर्श वैद्यकीय क्षेत्रासमोर ठेवला, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले. कोविड साथीच्या काळात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने समर्पित कोविड सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देत सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी केला आहे. या कार्याबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा विशेष सन्मान केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात रुग्णालयाने केलेल्या कार्याचा गौरव करणारे पत्र प्रदान करण्यात आले.

सुरुवातीच्या काळात सीपीआर रुग्णालयामधील नॉन-कोविड रुग्णाच्या सेवेचा भार डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने उचलला. त्यामुळे निरंतर अनुदानित आरोग्यसेवेचा लाभ जिल्हावासीयांसाठी सुरू ठेवता आला. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्राव तपासणी जलदगतीने व्हावी या उद्देशाने अत्यंत कमी वेळात एनएबीएल मोलेक्युलर बायोलॉजिकल लॅब (जैविक प्रयोगशाळा) उभारण्याचे काम खूपच कौतुकास्पद आहे. या प्रयोगशाळेने अत्यंत जलद गतीने नमुने तपासणी केल्याने कोविड निदान लवकर होणे शक्य झाले; त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयावरील मोठा भारही कमी झाला. या महासंकटात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सीपीआर रुग्णालयाला दिलेला पाठिंबा व सहकार्य उल्लेखनीय असल्याचे देसाई यांनी पत्रात नमूद केले आहे.

याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डीन डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, साहाय्यक कुलसचिव अजित पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो: ३० डीवाय हॉस्पिटल गौरव

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डीन डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, साहाय्यक कुलसचिव अजित पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: In the Corona period d. Y. The work of Patil Hospital is remarkable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.