इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:12 PM2021-04-22T17:12:35+5:302021-04-22T17:14:58+5:30

CoroanVirus Ichlakarnaji Kolahpur : इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या बेवारस महिलेचा मृतदेह बुधवारी (दि.२१) रात्रीपासून त्याच विभागात पडून आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह हलवला नसल्याने तेथे उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह नागरिक विभागातून बाहेर पडले. त्यामुळे खळबळ उडाली.

Corona positive body lying at IGM Hospital, Ichalkaranji | इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह पडून

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या बेवारस महिलेचा मृतदेह त्याच विभागात पडून आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देइचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह पडूनरुग्णालयात खळबळ ; इतर रुग्णांचा तेथून पळ

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या बेवारस महिलेचा मृतदेह बुधवारी (दि.२१) रात्रीपासून त्याच विभागात पडून आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह हलवला नसल्याने तेथे उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह नागरिक विभागातून बाहेर पडले. त्यामुळे खळबळ उडाली.

बावणे गल्ली येथील एका बेवारस महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तेथील महिलांनी १६ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या महिलेवर आयजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र,उपचारादरम्यान बुधवारी (२१) रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

ही माहिती रुग्णालयामार्फत पोलिसांना कळवली. तरीही त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी दुपारीपर्यंत बॅगेत बंद करून त्याच विभागामध्ये पडून होता. त्यामुळे तेथे उपचार घेणाऱ्या इतर नागरिकांनी तेथून पळ काढत विभाग सोडले. त्यामुळे रुग्णालयामध्ये खळबळ माजली.
 

Web Title: Corona positive body lying at IGM Hospital, Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.