कोरोना प्रतिबंधक उपायांचा वापर करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:01+5:302021-04-12T04:22:01+5:30
: कळे : कोरोना विषाणू संक्रमणाची तीव्रता वाढू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:च खबरदारी घेणे ...
:
कळे : कोरोना विषाणू संक्रमणाची तीव्रता वाढू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:च खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रत्येकाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपायांचा वापर करावा, असे आवाहन पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव पी.ए. यज्ञोपवित यांनी केले. कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कळे या प्रशालेत स्वयंचलित सॅनिटायझर वाटप मशीनचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य व संस्थेचे प्रशासन अधिकारी आर. के. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
स्वागत प्रशालेचे पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड यांनी केले, प्रास्ताविक ज्येष्ठ सहा. शिक्षक एन.एन. भोसले यांनी केले, आभार प्राचार्य एस. जी. गुरव यांनी मानले.
यावेळी एस.एच.कवठेकर, पी. एल. हावळ, एस. आर. भोई, एस. आर. वलेकर, एस. एस. पेंढारकर, एन. एन. पाटील, पी. बी. खामकर, एस. डी. वळवी, योगेश वराळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो नावाने सेव्ह