coronavirus: कोल्हापूर विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:26 PM2022-12-23T13:26:15+5:302022-12-23T13:27:07+5:30

चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क

Corona preventive measures system ready at Kolhapur airport | coronavirus: कोल्हापूर विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज

coronavirus: कोल्हापूर विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज

Next

उचगाव : कोल्हापूरविमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. विमानतळावरील सर्व कर्मचारीवर्गाला मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विमान प्रवाशांना मास्क ऐच्छिक वापरण्याचे आवाहन कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी केले आहे. 

चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासकीय यंत्रणांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिग आणि स सॅनीटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना

देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corona preventive measures system ready at Kolhapur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.