corona virus -‘कोरोना’प्रश्नी जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:04 PM2020-03-07T13:04:34+5:302020-03-07T13:06:15+5:30

‘कोरोना’ने माणसं मेल्यावर तयारी करणार काय? असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना शुक्रवारी धारेवर धरले. या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केली आहे? अशी विचारणाही त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली.

'Corona' - Question District District Surgeon | corona virus -‘कोरोना’प्रश्नी जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर

कोल्हापुरात ‘कोरोना’ आजाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Next
ठळक मुद्दे‘कोरोना’प्रश्नी जिल्हा शल्यचिकित्सक धारेवरमाणसं मेल्यावर तयारी करणार काय?,शिवसेनेकडून निवेदन

कोल्हापूर : ‘कोरोना’ने माणसं मेल्यावर तयारी करणार काय? असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना शुक्रवारी धारेवर धरले. या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केली आहे? अशी विचारणाही त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली.

कोरोना या गंभीर साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात त्याची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची विचारणा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हाप्रमुख पवार म्हणाले,‘आसपासच्या देशातून कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांची यादी केली आहे का? प्रतिष्ठेसाठी ‘सीपीआर’ऐवजी खासगी रुग्णालयात ‘कोरोना’चे रुग्ण दाखल होऊ शकतात. त्या रुग्णालयातूनही अशा रुग्णांसंदर्भातील माहिती लपविली जाऊ शकते. त्यांची नोंद घ्यावी.’

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यात सहाजण परदेशातून आले असून, त्यामधील पाचजण चीन व एकजण इराणमधून आला आहे. या सर्वांची तपासणी करून १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवले आहे. यामध्ये कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झालेले नाही. प्रशासन सर्वच पातळीवर खबरदारी घेत आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतु खबरदारीही घेतली पाहिजे. सरकारी रुग्णालयांत ‘आयसोलेशन’ विभाग सुरू करण्यात आला असून, तो खासगी रुग्णालयातही करावा, असे निर्देश दिले आहेत.

जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दत्ताजी टिपुगडे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, रणजित आयरेकर, मंजित माने, राजेंंद्र पाटील, धनाजी यादव, आदींचा समावेश होता.

तालुकास्तरावर ‘नियंत्रण कक्ष’ करा

‘कोरोना’साठी जिल्ह्यासह तालुका पातळीवरही नियंत्रण कक्ष सुरू करावेत, याची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर द्यावी, अशी मागणी करत प्रत्येकवेळी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करायचा का?अशी विचारणा संजय पवार यांनी केली.
 

Web Title: 'Corona' - Question District District Surgeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.