नऊजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:56+5:302021-05-22T04:23:56+5:30
निवडे, साळवण बाजारपेठ येथे तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताकडून विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अँटिजन चाचणी ...
निवडे, साळवण बाजारपेठ येथे तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताकडून विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अँटिजन चाचणी मोहिमेत ५४ जणांवर कारवाई करून अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये नऊजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या नऊ पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर गगनबावडा येथे पाठविण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला असतानाही ग्रामीण भागात काही ठिकाणी नागरिक विनाकारण फिरत असल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर राज्य मार्गावर गगनबावडा तालुक्यातील निवडे, साळवण बाजारपेठ येथे अनेक नागरिक व तरुण विनाकारण आरोग्यासाठीचे कारण देत फिरत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी गगनबावडा पोलीस प्रशासनाकडून निवडे, साळवण बाजारपेठ चौक येथे अँटिजन चाचणी मोहीम राबविण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनातून अँटिजन चाचणी मोहीम निवडे, साळवण बाजारपेठेत राबविली जात असल्याची बातमी परिसरात पसरल्यामुळे अनेकांनी निवडे, साळवण परिसराकडे येण्याचे टाळल्याचे दिसून आले.
साळवण बाजारपेठ चौक येथे गगनबावडा पोलीस प्रशासनाने राबविलेल्या अँटिजन चाचणी मोहीमप्रसंगी गगनबावडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.