कोल्हापूरला मोठा दिलासा: कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 07:59 PM2021-07-17T19:59:12+5:302021-07-17T20:01:09+5:30

CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्ण संख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले तर ९५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मृत्यूही १८पर्यंत खाली आले. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण संख्या हजाराच्या खाली आल्याने कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Corona sickness and death decreased, discharge also increased | कोल्हापूरला मोठा दिलासा: कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

कोल्हापूरला मोठा दिलासा: कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढलेमहिनाभरानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली

कोल्हापूर: संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्ण संख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले तर ९५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मृत्यूही १८पर्यंत खाली आले. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण संख्या हजाराच्या खाली आल्याने कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेले तीन दिवस स्थिर असणारा आकडा शनिवारी एकदम ९३८ पर्यंत कमी आला. २१ जूनला ९४० इतकी या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. त्यानंतर आकडे वाढतच गेल्याने चिंता वाढली होती, पण मागील आठवड्यापासून कोरोनाचा विळखा सैल होऊ लागला आहे. मृत्यूही २५ च्यावरच होते, पण शनिवारी तोही आकडा १८ पर्यंत कमी झाला. त्यातही एक मृत्यू मध्यप्रदेशातील आहे. कोल्हापूर शहरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्या ५८ ने वाढली असलीतरी मृत्यू अवघे तीन आहेत. हातकणंगलेत सर्वाधिक सहा मृत्यू आहेत.

गगनबावड्यात रुग्ण व मृत्यू संख्या शुन्यावर आली आहे. शनिवारी एकही बाधीत आढळला नाही आणि मृत्यूही झाला नाही. राधानगरी, भूदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगडमध्ये एकही मृत्यू झालेला नाही हे आणखी एक दिलासादायक बाब शनिवारी घडली.

आजचे मृत्यू

  • कोल्हापूर शहर: ०३ कसबा बावडा, गुजरी कॉर्नर, सुभाषनगर
  • कागल: ०२ पिंपळगाव, रणदिवेवाडी,
  • करवीर: ०३ वळीवडे, परिते, हलसवडे
  • हातकणंगले: ०६ पारगाव, इचलकरंजी दोन, पट्टणकोडोली, साजणी, हुपरी,
  • शिरोळ: ०२ सैनिक टाकळी, जयसिंगपूर,
  • गडहिग्लज: ०१ कडगाव,
  • इतर जिल्हा: ०१ गुलेवडी (मध्यप्रदेश),

Web Title: Corona sickness and death decreased, discharge also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.