घर सर्वेक्षणात २३० जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:25+5:302021-04-22T04:24:25+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या घर सर्वेक्षणात बुधवारी २३० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यावेळी १२ व्यक्तींना ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या घर सर्वेक्षणात बुधवारी २३० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यावेळी १२ व्यक्तींना ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत दैनंदिन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. बुधवारी ११ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत ६५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २६५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी २३० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
शहरातील अवधूत गल्ली, डांगे गल्ली, नागाळा पार्क, रुईकर कॉलनी, इंगवले कॉलनी, राजारामपुरी, शाहूपुरी, यादवनगर, तोरस्कर चौक, मस्कुती तलाव, जरगनगर, माळी कॉलनी, भाजी मंडई, राजेंद्रनगर, सुभाषनगर, रामानंदनगर, एसएससी बोर्ड, नेहरूनगर, ताराराणी कॉलनी, ताराबाई पार्क, साईक्स एक्स्टेंशन, सरदार तालीम, शिवाजी पेठ या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.