जिल्ह्यात कोरोना लसीकरण जनजागृती माेहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:30 AM2021-02-17T04:30:02+5:302021-02-17T04:30:02+5:30
कोल्हापूर : माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क केंद्राच्यावतीने कोव्हिड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेंतर्गत फिरत्या वाहनाला मंगळवारी ...
कोल्हापूर : माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क केंद्राच्यावतीने कोव्हिड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेंतर्गत फिरत्या वाहनाला मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे उपस्थित होते.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १६ व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
चौकट ०१
आत्मनिर्भर भारत आणि कोरोना लसीकरणाबाबतची जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्याबाबतची माहिती गावा-गावात पोहोचविण्याबाबत या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्याचा लाभ निश्चितपणे होईल.
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी
फाेटो: १६०२२०२१-कोल-कोरोना
फोटो ओळ:
कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फिरत्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी किशोर पवार, उषादेवी कुंभार, भाऊसाहेब गलांडे, प्रशांत सातपुते हे अधिकारी उपस्थित होते.