हणबरवाडीत कोरोना लसीकरणाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:57+5:302021-05-11T04:23:57+5:30
सेनापती कापशी : सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हणबरवाडी (ता. कागल) उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी ...
सेनापती कापशी : सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हणबरवाडी (ता. कागल) उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी या लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
खोत म्हणाले, ग्रामस्थांनी पहिला डोस कापशी आरोग्य केंद्रात घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्राधान्याने याठिकाणी दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करावे. यामुळे येथील ग्रामस्थांना कापशीला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. लाॅकडाऊनमुळे वाहतूकही बंद आहे. गावातच लस उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांची सोय होईल. यावेळी सुनील चौगले, रुग्णकल्याण समितीचे सदस्य चंद्रशेखर स्वामी, मुश्ताक देसाई व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.