गडमुडशिंगीत कोरोना लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:50+5:302021-09-15T04:28:50+5:30
कोरोना सद्य:स्थिती व तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासनाकडून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यावर भर दिला जात असून, गडमुडशिंगी ...
कोरोना सद्य:स्थिती व तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासनाकडून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यावर भर दिला जात असून, गडमुडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच कुमार व कन्या विद्या मंदिर या ठिकाणी २००० लस उपलब्ध झाल्या असून, या मोहिमेस गावातील सर्व सामाजिक संस्था, सहकारी संस्था, सर्व गणेश मंडळे, सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधीलकी जपून आपापल्या वॉर्डमधील (प्रभाग) ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशांना लस घेण्यास प्रवृत्त करावे. वय वर्षे १८ वरील पहिला डोस, तसेच ८४ दिवसांनंतर दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. सकाळी १० ते ४ या वेळेत लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे गावातील १०० टक्के लसीकरण मोहीम पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.