कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन द्यावे : राजेंद्र सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:09+5:302021-04-01T04:25:09+5:30
कसबा बीड (ता. करवीर) येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव ...
कसबा बीड (ता. करवीर) येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव तिबीले होते.
यावेळी गोकुळचे संचालक सत्यजित पाटील, शामराव सूर्यवंशी, महेगावचे सरपंच सज्जन पाटील एस. डी. जरग आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र व कसबा बीड आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केले. मेहबूब शेख यांनी आभार मानले. यावेळी दिनकर सूर्यवंशी, आत्माराम वरुटे, कसबा बीडच्या उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर गावडे, सचिन पानारी, वैशाली पाटील, जयश्री कांबळे, अंजना कुंभार, महेगावचे उपसरपंच रूपाली बोराटे, शामराव कुंभार उपस्थित होते.
फोटो ओळ
कसबा बीड (ता. करवीर) येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोरोना लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सर्जेराव तिबीले, महेगावचे सरपंच सज्जन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, दिनकर गावडे उपस्थित होते.