कौलव येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:39+5:302021-03-21T04:23:39+5:30
तालुका आरोग्य विभागाने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व उपकेंद्रात कोरोना लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ...
तालुका आरोग्य विभागाने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व उपकेंद्रात कोरोना लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाला सुलभ लस मिळू शकणार आहे. त्याचा समाजातील प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशिल पाटील (कौलवकर) यांनी केले आहे.
कौलव (ता.राधानगरी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण शुभारंभ सुरू करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सविता चरापले या होत्या. स्वागत व प्रास्ताविक आरोग्य अधिकारी यांनी केले. यावेळी ऋतुजा रविश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.लता प्रधान,अश्विनी सरावने,आनंदा बरगे,आरोग्य अधिकारी सरीत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आर.जी. चरापले, दीपक चरापले, दशरथ पाटील, बाबूराव पाटील, बापूसो पाटील, नामदेव पाटील, मधुकर पाटील, आनंदा गोसावी, संजय कांबळे, विनायक पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
२० कौलव कोरोना लस
फोटो ओळी :
कौलव (ता.राधानगरी)येथील उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा शुभारंभ करताना सुशील पाटील, यावेळी सरपंच सविता चरापले, ऋतुजा रविश पाटील, लता प्रधान, आनंदा बरगे आदि मान्यवर.