video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

By समीर देशपांडे | Published: July 13, 2022 01:24 PM2022-07-13T13:24:11+5:302022-07-13T13:50:21+5:30

जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले.

corona vaccination was done by Zilla Parishad health workers even during rains In Ajra taluka of Kolhapur district | video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात सुरू असलेल्या धुवांधार पावसामध्येही जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. ऊन, वारा, पाऊस  याची तमा न करता घरोघरी जावून लसीकरण करणाऱ्या या आरोग्यदुतांना सलाम. या आरोग्यदुतांचा पाण्यातून वाट करुन जीवघेणी कसरत करत जात असतानाचा व्हिडिओ सद्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सद्या लहान मुलांचे लसीकरण आणि ‘हर घर दस्तक’यातून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आजरा तालुक्यातील भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पेरणोली उपकेंद्र कार्यरत आहे. याअंर्तगत येणाऱ्या सव्वाशे वस्तीच्या धनगरवाडयाला केवळ पायवाट आहे. याठिकाणी चालतच जावे लागते.

या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसातही आरोग्य सहाय्यक पी. आर. नाईक, डी. एस. गोविलकर आणि आशावर्कर रेखा पांडुरंग दोरूगडे, लक्ष्मी केरबा जाधव मदतनीस यांनी जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले.

Read in English

Web Title: corona vaccination was done by Zilla Parishad health workers even during rains In Ajra taluka of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.