आजऱ्यात ४५ वर्षांवरील २८०२८ नागरिकांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:47+5:302021-04-17T04:22:47+5:30
गावागावांत कोरोना लसीविषयी केलेल्या प्रबोधनामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त काम झाले आहे. तालुक्यात कोरोनाने जवळपास ५० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ...
गावागावांत कोरोना लसीविषयी केलेल्या प्रबोधनामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त काम झाले आहे. तालुक्यात कोरोनाने जवळपास ५० जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामस्तरीय दक्षता समित्या पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. मात्र, मुंबई, पुणे यांसह अन्य ठिकाणी असणारे चाकरमानी आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. त्यांना प्रवासात कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे गावाकडे आल्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असताना ते बाधित आढळून येत आहेत.
गावागावांतील दक्षता समित्यांनी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी व कोरोनाची तपासणी केली आहे का? ४५ वर्षांवरील व्यक्तीने कोरोनाची लस घेतली आहे का? याची तपासणी केली जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय झालेले लसीकरण असे - भादवण ४६९०, मलिग्रे ६१९८, उत्तूर ६१४७, वाटंगी ५२४४, तर आजरा ग्रामीण रुग्णालयात ५७४९ असे एकूण २८०२८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यातून कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट २३३०० इतके होते. उद्दिष्टापेक्षा आजरा आरोग्य विभागाने जास्त काम करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.