इचलकरंजीतील कोरोना प्रतिबंधक लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:15+5:302021-04-10T04:25:15+5:30
इचलकरंजी : येथील १५ केंद्रांवर दररोज कोविड १९ ची प्रतिबंधक लस दिली जात होती. मात्र, शुक्रवारी सर्वच केंद्रांवरील लसीचा ...
इचलकरंजी : येथील १५ केंद्रांवर दररोज कोविड १९ ची प्रतिबंधक लस दिली जात होती. मात्र, शुक्रवारी सर्वच केंद्रांवरील लसीचा पुरवठा संपला असल्याचे आरोग्य सभापती संजय केंगार यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयजीएम रुग्णालय, बारा आरोग्य केंद्रे आणि दोन खासगी रुग्णालये अशा पंधरा ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे सुरू आहेत. शहरात एक लाख २५ हजार नागरिक लसीकरणास पात्र आहेत. त्यापैकी ३७ हजार जणांना लस दिली आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर तुटवडा भासत होता. आयजीएम रुग्णालयातच लस उपलब्ध होती. तीही शुक्रवारी १४० जणांना दिल्याने उपलब्ध लस साठाही संपला आहे. याबाबत सभापती केंगार यांच्याशी संपर्क साधला असता सर्वच केंद्रांवर लस संपल्याचे त्यांनी सांगितले.