आजऱ्यात कोरोनाची लस संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:14+5:302021-04-24T04:23:14+5:30

आजरा तालुक्यात आजपर्यंत विविध टप्प्यातून ३५६०० इतकी लस आली. आजअखेर ३५५०० लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयासह ...

The corona vaccine ran out during the illness | आजऱ्यात कोरोनाची लस संपली

आजऱ्यात कोरोनाची लस संपली

Next

आजरा तालुक्यात आजपर्यंत विविध टप्प्यातून ३५६०० इतकी लस आली. आजअखेर ३५५०० लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व सर्व उपकेंद्रांमधून ४५ वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

प्रत्येक गावातील उपकेंद्रामध्ये ही लस देण्याचे काम आरोग्य विभागाने पार पाडले आहे. लस देण्यापूर्वी गावात दवंडी पेटवून व संस्कार वाहिनीवरून लोकांमध्ये जनजागृती करून लसीकरणाचे काम सुरू आहे. सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आजरा शहर वगळता अन्य ठिकाणी ९८ ते ९९ टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजरा शहरात कोरोनाची लस घेण्याचा वेग फार कमी आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने प्रबोधनाचे काम सुरू केले आहे.

आरोग्य विभागाने कोरोनाची लस देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमार्फत दैनंदिन कोरोनाची लस पुरवठा करणे व ज्या त्या गावात जाऊन लसीकरण करणे हे काम सध्या सुरू आहे. सर्वांनी मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, कोरोनाला रोखा. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, असे सांगून लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. लस घेतल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असेही आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. दोन दिवसात कोरोनाची लस मिळाल्यास १०० टक्क्यापेक्षाही जास्त लसीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यशवंत सोनवणे यांनी दिली.

तालुक्यात ४५ वर्षांवरील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दिलेली कोरोनाची लस अशी - ग्रामीण रुग्णालय आजरा- ५२८५, प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर- ७७०७, भादवण- ५४९९, मलिग्रे- ७२१३, वाटंगी- ६३५० अशी लस देण्यात आली आहे.

तालुक्यात लसीकरणाचे काम चांगले असले तरी कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाणही १ एप्रिलपासून वाढले आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे.

Web Title: The corona vaccine ran out during the illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.