शहरात २८ हजार नागरिकांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:47 AM2021-03-13T04:47:08+5:302021-03-13T04:47:08+5:30

कोल्हापूर : महापालिका हद्दीतील २८ हजार ६६६ नागरिकांना आतापर्यंत कोरोनाचे लसीकरण झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात १९८९ नागरिकांना लस दिली. ...

Corona vaccines 28,000 citizens in the city | शहरात २८ हजार नागरिकांना कोरोना लस

शहरात २८ हजार नागरिकांना कोरोना लस

Next

कोल्हापूर : महापालिका हद्दीतील २८ हजार ६६६ नागरिकांना आतापर्यंत कोरोनाचे लसीकरण झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात १९८९ नागरिकांना लस दिली. ३ हजार ९१३ नागरिकांना दुसरा डोस दिला असल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, महापालिकेने शहरात कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. महापालिकेच्या ११ आरोग्य केंद्र आणि खासगी १३ केंद्रांमध्ये लस देण्याची सुविधा केली आहे. आतापर्यंत ९ हजार ५६८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिला असून ३७५१ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाईनच्या ४०२१ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला असून १६२ जणांनी दुसरा डोस दिला आहे. ४५ ते ५९ वर्षांतील व्याधीग्रस्त १५६१ तर ६० वयावरील ९५९८ नागरिकांना लस दिली आहे.

चौकट

मृत्यूदर कमी होण्यास मदत

संबंधित नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. जेवढ्या जलद लसीकरण मोहीम होईल, तेवढा कोरोना आटोक्यात आणण्यात यश येणार आहे. लसीमुळे १०० टक्के कोरोनामुक्त होत नसले तरी मृत्युदर कमी करण्यास नक्कीच मदत होत असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

फुलेवाडीत सोमवारी केंद्र

कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी केंद्राची संख्या वाढविली जात आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय वेळ ठरवून नागरिकांना लसीकरण दिले जाणार आहे. उपनगरामध्येही केंद्र सुरू केले जात आहे. मोरे-माने नगरमध्ये केंद्र सुरू केले असून फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रात सोमवारी लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.

डॉ. बलकवडे म्हणाल्या,

लसीकरण पूर्ण सुरक्षित

डोसची कमतरता नाही, पुरेसा साठा, १० आणखीन डोस उपलब्ध

परजिल्ह्यांतून येणाऱ्यांनी महापालिकेच्या पथकाला सहकार्य करावे. माहिती लपवू नये.

फेरीवाल्यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना करणार

कारवाईत चालढकलपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच निवडणुकीची पुढील प्रक्रिया

सयाजी घरफाळासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश

Web Title: Corona vaccines 28,000 citizens in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.