corona virus : कोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:09 AM2020-07-08T11:09:01+5:302020-07-08T11:10:26+5:30

सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता १०१२ वर जाऊन पोहोचली. त्यांपैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

corona virus: 1012 corona patients in Kolhapur; Both died, 29 new patients a day | corona virus : कोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण

corona virus : कोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण गोकुळशिरगांवात एकाच कुटुंबातील पाच, शिरोळमध्ये तब्बल नऊ नवे रुग्ण

कोल्हापूर : सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता १०१२ वर जाऊन पोहोचली. त्यांपैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

कोल्हापूर जिल्हा सुरुवातीच्या काळात सुरक्षित होता; परंतु पुणे, मुंबई तसेच रेड झोनमधील अन्य शहरांतून मूळचे कोल्हापूरवासीय येथे येऊ लागले तशी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. जरी संख्या वाढत जात असली तर संबंधित रुग्ण आधीच क्वारंटाईन होत असल्यामुळे त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु इचलकरंजी शहरात मात्र रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आजअखेर १३ बळी घेतले. मंगळवारी ही संख्या आणखी दोनने वाढली. इचलकरंजी येथील एका ७३ वर्षांच्या वृद्धावर कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. निदान होण्यापूर्वीच सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले होते. मंगळवारी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७५ वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला.

मंगळवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालापैकी तब्बल २८ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये शिरोळ तालुक्यात नऊ, इचलकरंजी शहरात पाच, चंदगड तालुक्यात तीन, करवीर तालुक्यात सात, आजरा तालुक्यात दोन तर गडहिंग्लज तालुक्यात एक रुग्णांचा समावेश आहे. तर एक रुग्ण रत्नागिरीचा आहे.

इचलकरंजीत चार पुरुषांसह एक महिला बाधित

इचलकरंजीतील चार पुरुष व एक महिला अशा पाच जणांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण स्वामीमळा, मेनरोड संत चौक, सुमेरु बिल्डींग, सातपुते गल्ली, भाग्यरेखा टॉकीज परिसरातील राहणारे आहेत. एक रुग्ण अब्दुललाटचा, एक रुग्ण इंगळी (हातकणंगले) तर एक जण रत्नागिरी येथील आहे.

गोकुळशिरगांवात पाच रुग्ण

करवीर तालुक्यात आढळलेल्या सात रुग्णांपैकी गोकुळ शिरगांव येथील पाच जणांचा समावेश आहे. सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. शनिवारी सापडलेल्या रुग्णाच्या घरातीलच हे सर्वजण आहेत. त्यामध्ये या रुग्णाची पत्नी, आई, वडील, भावजय यांचा समावेश आहे. त्यामुळे एसटी कॉलनी व म्हसोबा माळवाडी हा परिसर सील करण्यात आला. कणेरी व चापोडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

शिरोळमध्ये सर्वांधिक रुग्ण

कोरोनाने मंगळवारी शिरोळला धक्का दिला. शिरोळमध्ये सात तर तालुक्यात कुरुंदवाड चिप्री येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. त्यामुळे शिरोळमध्येही स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली.

तालुका निहाय आकडेवारी अशी -

तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ९४, भुदरगड- ७७, चंदगड- ११७, गडहिंग्लज- ११३, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३७, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- २१, नगरपरिषद क्षेत्र- १००, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ५९, जिल्हा व राज्यातील २१ (पुणे -२, सोलापूर- ३, मुंबई- ४, नाशिक- १, कर्नाटक- ७, आंध्रप्रदेश- १ आणि सातारा- २,रत्नागिरी-१) असे इतर असे मिळून एकूण १०१२ रुग्ण.

Web Title: corona virus: 1012 corona patients in Kolhapur; Both died, 29 new patients a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.