corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:07 AM2020-07-07T11:07:46+5:302020-07-07T11:10:24+5:30

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सोमवारी रात्री कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा तालुक्यातील पाच, चंदगड व हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येकी तीन, गडहिंग्लजच्या दोन, तर भुदरगडच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

corona virus: 14 new corona patients in Kolhapur | corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्ण

corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्णकोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर : जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सोमवारी रात्री कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा तालुक्यातील पाच, चंदगड व हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येकी तीन, गडहिंग्लजच्या दोन, तर भुदरगडच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रविवारी एका दिवसात २५ बाधित रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी १४ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांतूनसुद्धा अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे लॉकडाऊन शिथिल होत असताना रुग्णांची संख्या वाढत असून, ही बाब अधिकच चिंता वाढविणारी आहे.

आजरा तालुक्यातील भादवण आणि भादवणवाडी येथील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भादवणवाडीत एकाच घरातील तीन रुग्ण असून, त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. भादवणमधील ८५ वर्षांच्या वृद्धास कोरोना झाला, तर त्याच गावातील २३ वर्षांचा एक तरुण बाधित असल्याचे तपासणीत आढळून आले.

अलीकडे इचलकरंजी सुद्धा रेड झोन आले असून, सोमवारी इचलकरंजीत तीन रुग्ण आढळून आले. त्याम‌ध्ये कलानगरचे दोन व चंदूरच्या एकाचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील मुधाळतिट्टा येथील ३१ वर्षीय तरुणाला कोरोना झाला. गडहिंग्लज शहरातील दोन रुग्ण बाधित आढळले. चंदगड तालुक्यातही तीन रुग्ण सापडले.

सापडलेले रुग्ण तरुण वयाचे

सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत आढळून आलेल्या १४ रुग्णांपैकी भादवणचे ८५ वर्षांचे एक वृद्ध वगळता बाकीचे बारा कोरोनाबाधित रुग्ण हे तीस वर्षांखालील तरुण आहेत. इचलकरंजी शहरातील एक ११ वर्षांच्या मुलगीचाही त्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अशी - आजरा - ९२ , भुदरगड - ७७, चंदगड - ११४, गडहिंग्लज - ११२, गगनबावडा - ७, हातकणंगले - १८, कागल - ५८, करवीर- ३०, पन्हाळा - २९, राधानगरी - ७३, शाहूवाडी - १८७, शिरोळ - १२ , कोल्हापूर शहर - ५९, नगरपालिका ९२ (इचलकरंजी ७०, जयिसंगपूर ५, कुरुंदवाड - ९, कागल -१ शिरोळ -१ हुपरी -१ , पेठवडगाव -१) अन्य राज्यांतील -२० ( पुणे २, सोलापूर ३, मुंबई ४, नाशिक १, सातारा २ , कर्नाटक ७, आंध्र प्रदेश १)

  •  एकूण रुग्ण संख्या - ९८०
  • बरे झालेले रुग्ण - ७४८
  • कोरोनामुळे मृत - १३
  • उपचार घेत असलेले रुग्ण - २१९
  •  सोमवारी घेतलेले स्राव - ५६२
  • तपासणी झालेल्या व्यक्ती - ११०६

Web Title: corona virus: 14 new corona patients in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.