corona virus : जिल्ह्यातील सर्वेक्षणातून १४८ जण निघाले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:05 PM2020-09-22T16:05:50+5:302020-09-22T16:11:10+5:30
माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावचाचणीनंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत.
कोल्हापूर : माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावचाचणीनंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत.
शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला सोमवारी सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सर्वेक्षणामध्ये ५५७ जणांना ह्यसारीह्ण हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे; तर एक लाख २३ हजार ९५० जणांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आधीचे आजार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ४६५८ जणांना ताप, सर्दीची लक्षणे आढळली आहेत.
नागरिक आपणहून स्राव तपासणीसाठी जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढतच राहतो आणि पॉझिटिव्ह असलेल्या परंतु त्याची माहिती नसलेल्या रुग्णांमुळे संसर्ग होण्यास मदतच होते. म्हणूनच अशा पद्धतीने दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यातील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. यातील अनेक संशयितांचे स्राव घेण्यात आले. यातील १४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याची तपासणी झाली नसती तर त्यांच्याकडून घरच्या आणि समाजातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता. त्यामुळे ही सर्वेक्षण मोहीम साहाय्यभूत ठरत आहे.
सारी रुग्ण ताप रुग्ण जुने आजार रुग्ण संदर्भित रुग्ण पॉझिटिव्ह
- ग्रामीण ४०५ ४०८७ ८४४०१ १४८६ ९२
- शहरी ५२ १२५ १५३०९ ८७ १५
- कोल्हापूर शहर १०० ४४६ २४२४० ६३१ ४१
एकूण ५५७ ४६५८ १२३९५० २२०४ १४८
शासनाने अतिशय विचारपूर्वक हे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अनेक विभाग एकत्रित येऊन घरोघरी तपासणी करीत आहेत. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांचे वेळीच स्राव घेतले जात आहेत. परिणामी संभाव्य कोरोनाचा संसर्ग वाढण्यास आळा घालणे शक्य होणार आहे.
- अमन मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर