corona virus : कोरोनात १७००० बेफिकीर, दंडवसुली ३१,००,०००, महापालिकेकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 07:06 PM2020-09-14T19:06:29+5:302020-09-14T19:10:24+5:30

गेल्या अडीच महिन्यांमध्ये मास्क, हँडग्लोव्हज नसणारे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे, सातनंतर दुकाने सुरू ठेवणारे अशा १७ हजार ५७८ लोकांकडून ३१ लाख ७८२ इतका दंड वसूल केला आहे.

corona virus: 17,000 unconcerned in Corona, 31,00,000 fined, action taken by Municipal Corporation | corona virus : कोरोनात १७००० बेफिकीर, दंडवसुली ३१,००,०००, महापालिकेकडून कारवाई

corona virus : कोरोनात १७००० बेफिकीर, दंडवसुली ३१,००,०००, महापालिकेकडून कारवाई

Next
ठळक मुद्देकोरोनात १७००० बेफिकीर, दंडवसुली ३१,००,०००, महापालिकेकडून कारवाई मास्क,सोशल डिस्टंसिंग,हॅन्डग्लोज वापराला हरताळ

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना काही सक्तीचे नियम लागू केले आहेत. मात्र काहींकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

गेल्या अडीच महिन्यांमध्ये मास्क, हँडग्लोव्हज नसणारे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे, सातनंतर दुकाने सुरू ठेवणारे अशा १७ हजार ५७८ लोकांकडून ३१ लाख ७८२ इतका दंड वसूल केला आहे.

कारवाईसाठी पाच पथके

  • जुना राजवाडा - केएमटीकडील वाहनासह भरारी पथक व पोलीस कर्मचारी
  • राजारामपुरी पोलीस ठाणे - केएमटीकडील वाहनासह भरारी पथक व पोलीस कर्मचारी
  • लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे - आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या वाहनासह पोलीस कर्मचारी
  • शाहूपुरी पोलीस ठाणे - इस्टेट ऑफिसर सचिन जाधव व पोलीस कर्मचारी
  • शहर वाहतूक शाखा - पंडित पोवार, अतिक्रमण विभाग व वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी


गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र पथके

पाच पथकांव्यतिरिक्त राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, राजवाडा व शाहूपुरी अशी चार पोलीस ठाणी यांना प्रत्येकी चार महापालिका व केएमटीकडील कर्मचारी गर्दी व चौकांमध्ये कारवाई करण्यासाठी नियुक्त केले आहेत.

पाच पथकांकडून करण्यात आलेली कारवाई

  • नागरिक ७२०६
  • दंड वसूल १८ लाख ५००

    केएमटीकडील पथकाकडून कारवाई
  • नागरिक १०३७२
  • दंड वसूल १३ लाख ३२८२
  • एकूण नागरिकांवर केलेली कारवाई १७५७८
  • एकूण वसूल दंड ३१ लाख ३ हजार ७८२

Web Title: corona virus: 17,000 unconcerned in Corona, 31,00,000 fined, action taken by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.