corona virus : एका दिवसात २१०० नागरिक कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:45 PM2020-07-21T12:45:34+5:302020-07-21T12:46:20+5:30
कोल्हापुरात रविवारी २१०० नागरिक पासद्वारे आले आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने आठवडाभर प्रवेश मिळणे शक्य नसल्याने एका दिवसात इतक्या संख्येने लोक आल्याचे चित्र आहे. या नागरिकांना अगोदर पास मंजूर झाला होता, त्यांनाच रविवारी जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला होता.
कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी २१०० नागरिक पासद्वारे आले आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने आठवडाभर प्रवेश मिळणे शक्य नसल्याने एका दिवसात इतक्या संख्येने लोक आल्याचे चित्र आहे. या नागरिकांना अगोदर पास मंजूर झाला होता, त्यांनाच रविवारी जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला होता.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन आठवड्यांची ई पास सुविधाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना कोल्हापुुरात येता येणार नाही.
मुंबईचा ओघ सुरूच
हे नागरिक मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे,व अन्य जिल्ह्यांतून आले आहेत. यात सर्वाधिक नागरिक शिरोळ ४२४, हातकणंगले ३७५, आणि करवीर तालुक्यात ३६६ जण आले आहेत