corona virus :सीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:09 PM2020-08-11T17:09:54+5:302020-08-11T17:12:37+5:30

कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

corona virus: 250 new oxygen beds in CPR | corona virus :सीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेड

corona virus :सीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेड

Next
ठळक मुद्देसीपीआरमध्ये ऑक्सिजनचे नवीन २५० बेडजिल्हाधिकारी देसाई यांनी दिली माहिती, सध्या ८० बेड आहेत तयार

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

 जिल्हाधिकारी देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सीपीआरला भेट दिली. 

देसाई म्हणाले, कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे सीपीआरमधील बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. सध्या ऑक्सिजनचे ८० बेड तयार आहे. आणखी ८० बेडचे काम सुरू असून ते दोन दिवसांत कार्यान्वित केले जातील. उर्वरित ९० बेडचे कामही या आठवड्यात पूर्ण होईल.

इचलकरंजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तेथील मृत्युदरही जास्त आहे. येथील व्यवस्थापनाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय इचलकरंजीतील आयजीएममध्ये हलविण्यात आले आहे. डॉ. बी. सी. केम्पी-पाटील हे आता तिथून काम पाहतील, असे जिल्हाधिकारी देसाई सांगितले.

ग्रामीण भागातही बिले तपासायला ऑडिटर

खासगी दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या भरमसाठ बिलावर ऑडिटरमुळे नियंत्रण आले आहे. बिलाची रक्कम कमी करून घेतली जात आहे. आता ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांसाठीही ऑडिटर्स नेमले असून ज्या दवाखान्यात ५० बेड आहेत. त्या दवाखान्यांसाठी ऑडिटर्स बिलाची छाननी करतील. सध्या ग्रामीण भागात २७ ठिकाणी ऑडिटर्स कार्यरत आहेत..


 

Web Title: corona virus: 250 new oxygen beds in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.