corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २८ मृत्यू; ५३६ नवे रुग्ण, इचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:27 AM2020-08-31T11:27:06+5:302020-08-31T11:29:04+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, रविवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सात, तर इचलकरंजी शहरातील आठजणांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्युसंख्या ६९९ वर पोहोचली आहे.

corona virus: 28 deaths in Kolhapur district; 536 new patients, Ichalkaranji, Corona in Kolhapur city | corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २८ मृत्यू; ५३६ नवे रुग्ण, इचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहर

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २८ मृत्यू; ५३६ नवे रुग्ण, इचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहर

Next
ठळक मुद्देइचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहरमृत्युसंख्या ६९९ वर; एकूण रुग्णसंख्या २३०४२; दिवसभरात ६८७ डिस्चार्ज

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, रविवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सात, तर इचलकरंजी शहरातील आठजणांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्युसंख्या ६९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५३६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २३०४२ वर पोहोचली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरात नव्या १६५ रुग्णांची भर पडली. दिवसभरात ६८७ रुग्णांचा डिस्चार्ज देऊन घरी पाठवले, ही समाधानकारक बाब आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्येचा व मृत्यूचाही उद्रेक होत आहे. कोरोनाची स्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. गेल्या २४ तासांत ५३६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही रुग्णसंख्या २३०४२ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ६९९ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या ही १४३४७ वर पोहोचली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ७९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात १७३१ अहवाल प्राप्त

गेल्या २४ तासांत प्रशासनास १७३१ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांमध्ये १२२८ निगेटिव्ह, तर ३९१ अहवाल पॉझिटिव्ह आले. ३५५ ॲन्टिजेन चाचणी अहवालांपैकी ९८, तर खासगी प्रयोगशाळेतील ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात एकूण ५३६ अहवाल पॉझिटिव्ह आले. २४ तासांत जिल्ह्यातील विविध ७४ कोविड सेंटरमध्ये एकूण १६२६ जणांची स्रावचाचणी घेण्यात आली, तर ३५५ जणांची ॲन्टिजेन चाचणी घेण्यात आली.

२८ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत २८ कोरोनाग्रस्तांचे बळी गेले; तर बळींची संख्या ६९९ वर पोहोचली आहे. २४ तासांत बळी गेलेले पुढीलप्रमाणे : कोल्हापूर शहर- वय ५४/पुरुष अंबाई टँक परिसर, ७०/ महिला कळंबानजीक, ५४/पुरुष राजेंद्रनगर, ७०/ पुरुष कदमवाडी, ६५/पुरुष शास्त्रीनगर, ४०/पुरुष शिवाजी पेठ, ४६/पुरुष नाळे कॉलनी. इचलकरंजी शहर- वय ६९/ महिला आमरेमळा, ५०/पुरुष अष्टविनायकनगर, ६९/पुरुष गावभाग, ७०/पुरुष गावभाग, ६६/पुरुष शहापूर, ८०/पुरुष लिगाडे मळा, ५८/पुरुष इचलकरंजी, ६७/ पुरुष आझाद चित्रमंदिरानजीक इचलकरंजी. ६५/पुरुष माणगाव (ता. शाहूवाडी), ५०/ पुरुष शिवाजीनगर आजरा, ६५/महिला कबनूर (ता. हातकणंगले), ६५/पुरुष टाकवडे (ता. शिरोळ), ६२/पुरुष धरणगुत्ती (ता. शिरोळ), ६०/ महिला पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), ७१/पुरुष तारदाळ (ता. हातकणंगले), ६६/पुरुष सरवडे (ता. राधानगरी), ६५/पुरुष हुपरी (ता. हातकणंगले), ७५/पुरुष पाडळी खुर्द (ता. करवीर). ७८/महिला बत्तीस शिराळा (ता. सांगली), ७३/पुरुष कारदगा (कर्नाटक), ६५/महिला निपाणी (कर्नाटक).

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तालुकावार : आजरा-३४३, भुदरगड-४८५, चंदगड-५४३, गडहिंग्लज-५१०, गगनबावडा-४७, हातकणंगले-२७११, कागल-६०७, करवीर- २५४०, पन्हाळा-७७३, राधानगरी-६०८, शाहूवाडी-५०६, शिरोळ-१२१०, नगरपालिका - ४२२२ (इचलकरंजी २८४६, जयसिंगपूर ३९०, कुरुंदवाड ९२, गडहिंग्लज २०, कागल १७५, शिरोळ १३६, हुपरी ३८४, पेठवडगाव १३४, मलकापूर ०३, मुरगूड ४२).

कोल्हापूर शहर - ७३२९. इतर जिल्हा/राज्य-६०८ (पुणे १३, कर्नाटक १६५, आंध्र प्रदेश ४)

Web Title: corona virus: 28 deaths in Kolhapur district; 536 new patients, Ichalkaranji, Corona in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.