CoronaVirus : बेळगावात ३0 वर्षीय महिलेला कोरोना, कर्नाटकात एकुण रुग्णसंख्या १९२२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 06:33 PM2020-05-30T18:33:05+5:302020-05-30T18:34:09+5:30
बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे.
बेळगाव : बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवडाभरात रोज कर्नाटकातील रुग्ण संख्या शंभरहून अधिक आकड्यांनी वाढत आहे. शनिवारीही नव्या १४१ रुग्ण आढळले. यापैकी सुमारे ८८ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.
आज सायंकाळी ज्या महिलेला कोरोनाची बाधा झाली, ती सीमेवरील बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावची आहे.
ती मुंबईहून माहेरी आली होती. मुंबईतून आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहून ती आपल्या घरी गेली होती. तिथं गेल्यावर ताप आल्याने तिची चाचणी करण्यात आली, त्यात ती पॉझिटिव्ह आढळली आहे. या महिलेच्या माहेरच्या घरातील लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.