corona virus : आठवड्यात विविध सुविधांयुक्त ३८१ बेड उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:06 PM2020-08-26T16:06:23+5:302020-08-26T16:09:33+5:30

कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांनी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा एक आठवड्यात वाढवाव्यात, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित ३७ रुग्णालयांना बजावले.

corona virus: 381 beds with various facilities will be available in a week | corona virus : आठवड्यात विविध सुविधांयुक्त ३८१ बेड उपलब्ध होणार

corona virus : आठवड्यात विविध सुविधांयुक्त ३८१ बेड उपलब्ध होणार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी व आयुक्तांचा आदेश अतिरीक्त सुविधा देण्याची ३७ रुग्णालयांवर सक्ती

कोल्हापूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांनी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा एक आठवड्यात वाढवाव्यात, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित ३७ रुग्णालयांना बजावले. त्यामुळे या रुग्णालयांत आठवड्याभरात विविध सुविधांनी युक्त ३८१ बेड उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे एकूण बेडची क्षमता १३०१ इतकी होऊ शकेल.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्याकरिता सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचा उपचारसुद्धा मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व आयुक्तांनी मंगळवारी हे आदेश दिले.

शहरात एकूण ३७ खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांतील ८० टक्के बेड आधीच जिल्हा प्रशासनाने अधिग्रहण केले आहेत. तेथे कोविड व नॉन-कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यकाळात वैद्यकीय सुविधा वाढविणे अत्यावश्यक बाब बनली आहे.

सध्या ३७ खासगी व विश्वस्त रुग्णालयातून ऑक्सिजन बेड ४२६, नॉन ऑक्सिजन बेड २८४, आयसीयू बेड २१०, व्हेंटिलेटर ५६, हायफ्लो नेझल युनिट २४ एवढी वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु ती अपुरी पडत असल्याने ही क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व रुग्णालयांना मिळून अतिरक्त १०५ व्हेंटिलेटर्स, ८० हायफ्लो नेझल युनिट, २१६ ऑक्सिजन बेड, १६५ आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णालयाने किती अतिरिक्त सुविधा वाढवायच्या हे त्यांना ठरवून दिले आहे. विशेष म्हणजे येत्या आठ दिवसांत या सर्व सुविधा संबंधित रुग्णालय प्रशासनाने स्वत:च्या फंडातून उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

संबंधित रुग्णालयांनी ठरवून दिलेल्या अतिरिक्त वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याकरिता तसेच जे रुग्णालय प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता अधिकारीही नियुक्त केले आहेत.

ज्या रुग्णालय प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी होणार नाही, त्यांच्यावर आयपीसी कलम १८८ (१८६० चे ४५) नुसार गुन्हा दाखल केला जाईल; तसेच रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

                           सद्य:स्थिती     वाढीव    एकूण (आठवड्यानंतर)

  • ऑक्सिजन बेड -          ४२६             २१६        ६४२
  • नॉन-ऑक्सिजन-          २८४             ००          ००
  • आयसीयू-                      २१०           १६५       ३७५
  • व्हेंटिलेटर व एनआयव्ही - ५६           १०५      १६१
  • एचएफएनसीएस -            २४             ८०      १०४

एकूण                              ९२०           ३८१     १३०१

Web Title: corona virus: 381 beds with various facilities will be available in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.