corona virus : कोरोना केअर सेंटरमध्ये ४४७ बेड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:17 PM2020-09-21T12:17:51+5:302020-09-21T12:18:48+5:30
महापालिकेच्या १२ कोरोना केअर सेंटरमध्ये ४४७ बेड सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ५३ बेड ऑक्सिजनचे, तर ३९४ बेड नॉन-ऑक्सिजनचे आहेत.
Next
ठळक मुद्देकोरोना केअर सेंटरमध्ये ४४७ बेड उपलब्धदुधाळी येथेही लवकरच नवीन सेंटर
कोल्हापूर : महापालिकेच्या १२ कोरोना केअर सेंटरमध्ये ४४७ बेड सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ५३ बेड ऑक्सिजनचे, तर ३९४ बेड नॉन-ऑक्सिजनचे आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये ८६३ बेडची सुविधा आहे. येथे ३४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी २४९ नॉन-ऑक्सिजन, ९५ ऑक्सिजन, पाच व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा समावेश आहे. याचबरोबर सायबर, कसबा बावडा येथेही सेंटर असून, दुधाळी येथेही लवकरच नवीन सेंटर उभारले जात आहे.