corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण तर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:50 AM2020-10-31T10:50:13+5:302020-10-31T10:53:00+5:30

CoronaVirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी नवीन ५६ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एक रुग्णाचा मृत्यू झाला. नवीन कोरोना रुग्णापैकी ३० जणांचे शासकीय लॅबमध्ये तर २१ जणांचे खासगी रुग्णालयांत कोरोनाचे निदान झाले.

corona virus: 56 new corona patients and one death in the district | corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण तर एकाचा मृत्यू

corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण तर एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण तर एकाचा मृत्यूआजरा, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यात एकही नवीन रुग्ण नाही

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी नवीन ५६ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एक रुग्णाचा मृत्यू झाला. नवीन कोरोना रुग्णापैकी ३० जणांचे शासकीय लॅबमध्ये तर २१ जणांचे खासगी रुग्णालयांत कोरोनाचे निदान झाले.

जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसांपासून सातत्याने कोरोना संसर्गाचा जोर ओसरत आहे. त्याच मालिकेत शुक्रवारी ५६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. चंदगड तालुक्यात माणदुर्ग येथील ७५ वर्षीय महिलेचा मात्र कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शुक्रवारी आजरा, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर भुदरगड. चंदगड, गगनबावडा येथे प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली. याशिवाय कोल्हापूर शहरात १७, करवीर तालुक्यात आठ, शिरोळ तालुक्यात पाच तर शाहूवाडी तालुक्यात सहा रुग्णांची नोंद झाली.

  • जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या - ४८ हजार ०७२
  • कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ४५ हजार ४८२
  • आतापर्यंत मृत रुग्णांची संख्या - १६४०
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ९५०


जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या -

आजरा - ८४२, भुदरगड - १२०५, चंदगड - ११६७, गडहिंग्लज - १३९२, गगनबावडा - १४१, हातकणंगले - ५२२२, कागल - १६३३, करवीर - ५५३४, पन्हाळा - १८३६, राधानगरी - १२१३, शाहूवाडी - १३१७, शिरोळ - २४५४, नगरपालिका हद्द - ७३२२, कोल्हापूर शहर - १४,५७८, इतर जिल्हा - २२१६.

Web Title: corona virus: 56 new corona patients and one death in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.