corona virus :कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत ६२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:56 PM2020-09-03T16:56:19+5:302020-09-03T16:57:20+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेपंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यामध्ये अजूनही प्रशासनाला यश येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेपंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यामध्ये अजूनही प्रशासनाला यश येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये हे ६२ रुग्णांचे मृत्यू झाले असून सोमवारी सर्वाधिक म्हणजे ३५ मृत्यू झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील मृत्यू हे सर्वाधिक आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११९५ नवे रुग्ण सापडले असून गेल्या काही दिवसांत रोज ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत.
जिल्हा प्रशासनाने ४०० ऑक्सिजन बेड व ३०० अन्य बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत असल्याने हा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे.