corona virus : जिल्ह्यात ६३० रुग्ण कोरोनामुक्त , तर ३४ नव्या रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 07:18 PM2020-10-24T19:18:51+5:302020-10-24T19:20:02+5:30
coronavirus, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ६३० रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले, तर केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ६३० रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले, तर केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून शनिवारी आणखी मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३४ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची रुग्णवाढीचा सर्वात निच्चांक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४७ हजार ७४२ इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४४ हजार ७५८ झाली आहे.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १६२९ झाली आहे. मयत झालेल्यांमध्ये हातकणंगले तालुक्यातील दोन, पन्हाळा तालुक्यातील एक, शाहूवाडी तालुक्यातील दोन, करवीर तालुक्यातील एक, कागल तालु क्यातील एक, कोल्हापूर शहरातील एक रुग्णाचा समावेश आहे.
आता केवळ १३५५ रुग्ण रुग्णालये तसेच घरात राहून उपचार घेत आहेत.आजरा, चंदगड, गगनबावडा तालुक्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. भुदरगड, कागल,राधानगरी, शिरोळ येथे केवळ प्रत्येकी एकच रुग्णाची नोंद झाली. गडहिंग्लज तालुक्यात दोन, हातकणंगले तालुक्यात चार, करवीर तालुक्यात पाच तर कोल्हापूर शहरात १३ रुग्णांची नोंद झाली.
तालुका निहाय रुग्ण संख्या -
आजरा - ८३८, भुदरगड - ११९२, चंदगड - ११५४, गडहिंग्लज - १३७९, गगनबावडा - १४०, हातकणंगले - ५१८३, कागल - १६२०, करवीर - ५५००, पन्हाळा - १८२८, राधानगरी - १२१०, शाहूवाडी - १२७३, शिरोळ - २४३९, नगरपालिका हद्द - ७३०३, कोल्हापूर शहर - १४, ४९५, इतर जिल्हा - २१८८.