corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे  ६४० नवे रुग्ण, तर २० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:11 PM2020-08-29T13:11:24+5:302020-08-29T13:13:07+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक शुक्रवारीदेखील अखंडित राहिला. २४ तासांत ६४० नवीन रुग्ण आढळून आले; तर २० जणांचा मृत्यू झाला. समाधानाची बाब म्हणजे ६७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी नवीन रुग्ण वाढण्याचे प्रमाण मात्र काही कमी होत नाही.

corona virus: 640 new corona patients and 20 deaths in Kolhapur district | corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे  ६४० नवे रुग्ण, तर २० जणांचा मृत्यू

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे  ६४० नवे रुग्ण, तर २० जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे  ६४० नवे रुग्ण, तर २० जणांचा मृत्यू६७१ जणांना डिस्चार्ज : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक शुक्रवारीदेखील अखंडित राहिला. २४ तासांत ६४० नवीन रुग्ण आढळून आले; तर २० जणांचा मृत्यू झाला. समाधानाची बाब म्हणजे ६७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी नवीन रुग्ण वाढण्याचे प्रमाण मात्र काही कमी होत नाही.

जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून त्याचा वेग अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रोज ६०० ते ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. रुग्णवाढीची साखळी तोडण्याचे प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होत असले तरी त्यात यश काही आलेले नाही.

शुक्रवारी सीपीआर रुग्णालयातने जारी केलेल्या बुलेटिननुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६४० नवीन रुग्ण आढळून आले. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १७ पुरुष, तर तीन महिलांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव, माणगाव, कबनूर, कोरोची, रुकडी; कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, कळंबा रिंग रोड, जाधववाडी, फुलेवाडी, करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी, वडणगे, शिरोळ तालुक्यातील शिरोळ, अब्दुललाट, इचलकरंजीतील आमराई मळा, राधानगरीतील सरवडे, पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी, आजऱ्यातील साठे कॉलनी, भुदरगड तालुक्यातील नाधवडे, सांगलीतील खणभाग येथील व्यक्तींचा समावेश आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार आरटी-पीसीआरच्या १४७३ चाचण्यांपैकी ९९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ३६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ६७८ ॲन्टिजेन तपासण्यांपैकी ६०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी रुग्णालयांतून झालेल्या तपासण्यांपैकी १९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

१३ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी ६७१ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ९४८ वर गेली आहे.

या तालुक्यांत रुग्णसंख्या घटतेय

गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात २०७ नवीन रुग्ण आढळून आले. हातकणंगले तालुक्यात ९४, कागल तालुक्यात २४, पन्हाळा तालुक्यात ३६, करवीर तालुक्यात ६९, राधानगरी तालुक्यात २१, शिरोळ तालुक्यात ३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे आजरा, भुदरगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे.

२१ हजारांवर रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ७२३ इतकी झाली असून त्यांपैकी ८१२१ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचा कालावधी १० दिवसांपर्यंत खाली आला आहे. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना दहाव्या दिवशी घरी सोडले जात आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

आजरा - ३३१, भुदरगड - ४५२, चंदगड - ५०२, गडहिंग्लज - ४९७, गगनबावडा - ४४, हातकणंगले- २५४५, कागल - ५२०, करवीर - २४२४, पन्हाळा- ७२७, राधानगरी - ५८३, शाहूवाडी - ४८८, शिरोळ - ११२३, नगरपालिका हद्द - ४०९०, कोल्हापूर शहर - ६८२१, इतर जिल्हा - ५७६.

  • एकूण रुग्ण - २१,७२३
  •  डिस्चार्ज - १२, ९४८
  • एकूण मृत - ६५४
  •  उपचार घेणारे रुग्ण - ८१२१

Web Title: corona virus: 640 new corona patients and 20 deaths in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.