corona virus : तीन दिवसांत नवे ७४ रुग्ण, चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 09:25 PM2020-11-18T21:25:08+5:302020-11-18T21:26:33+5:30
corona virus, kolhapurnews गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण आढळले असून, चारजणांचा मृत्यू झाला आहे; तर १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाचपर्यंत संपलेल्या २४ तासांत नोंदवण्यात आली. या कालावधीत केवळ ११ नवे रुग्ण सापडले होते. सध्या ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण आढळले असून, चारजणांचा मृत्यू झाला आहे; तर १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाचपर्यंत संपलेल्या २४ तासांत नोंदवण्यात आली. या कालावधीत केवळ ११ नवे रुग्ण सापडले होते. सध्या ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या चार दिवसांत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील ७४ वर्षीय महिला, आष्टा (ता. वाळवा) येथील ७० वर्षीय पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे येथील ५० वर्षीय महिला आणि हातकणंगले येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४८७९२ इतकी नोंदवण्यात आली असून त्यांपैकी ४६५२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६७० जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत ११६५ जणांची तपासणी करण्यात आली असून १२१२ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत; तर १६७ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ९ ते १२ वी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना स्राव तपासणी बंधनकारक केल्यामुळे आता स्राव देणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.