corona virus : दिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:20 AM2020-09-17T11:20:38+5:302020-09-17T11:26:06+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काहीशी घटते आहे, ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी २४ तासांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५८४, तर मृत्युसंख्याही २१ पर्यंत आली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत घटलेली रुग्णसंख्या ही समाधानकारक बाब आहे. दिवसभरात कोल्हापूर शहरात सायंकाळपर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला; तर इचलकरंजी शहरात सुदैवाने एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

corona virus: comforting; The number of patients in the district is declining | corona virus : दिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेय

corona virus : दिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेय

googlenewsNext
ठळक मुद्देदिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेयनवे ५८४ रुग्ण : ५२२ जणांना डिस्चार्ज; दिवसभरात २१ मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काहीशी घटते आहे, ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी २४ तासांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५८४, तर मृत्युसंख्याही २१ पर्यंत आली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत घटलेली रुग्णसंख्या ही समाधानकारक बाब आहे. दिवसभरात कोल्हापूर शहरात सायंकाळपर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला; तर इचलकरंजी शहरात सुदैवाने एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

गेले दोन महिने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. रोज सरासरी ११०० ते १२०० रुग्णसंख्या, तर ३० ते ३५ मृत्युसंख्या अशी भीतिदायक परिस्थिती होती. या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र राबत आहे. त्या मानाने गेल्या आठवडाभरात मृत्युसंख्या घटल्याचे दिसून आले नसले तरी रुग्णसंख्या मात्र काहीशी घटल्याचे दिसते. मात्र बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत ५८४ नव्या रुग्णांची नोंद झाली; तर जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५२२ जणांनी उपचाराअंती कोरोनाला हरवून, डिस्चार्ज घेऊन घर गाठले. कोल्हापूर शहरात दिवसभरात ११०, तर इचलकरंजी शहरात १३, करवीर तालुक्यात ८५, हातकणंगले ६५ अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

  • एकूण रुग्णसंख्या : ३६६५५
  • एकूण डिस्चार्ज संख्या : २४८०४
  •  एकूण मृत्युसंख्या : ११४४
  • सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १०७०७

    पॉझिटिव्ह ६६४० रुग्णांवर घरीच उपचार
     

कोल्हापूर शहरात तब्बल ४६१९ पॉझिटिव्ह रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत; तर ग्रामीण भागात व नगरपालिका हद्दीतील सुमारे २०२१ पॉझिटिव्ह रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. अशा ह्या ६६४० रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसली तरीही त्यांचे स्राव पॉझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापुरात तिघांचा मृत्यू, तर इचलकरंजीत निरंक

कोल्हापूर शहरात राजारामपुरी, देवकर पाणंद आणि न्यू पॅलेस या तीन ठिकाणी कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले, तर गेले तीन महिने मृत्यूचे तांडव पाहिलेल्या इचलकरंजी शहरात बुधवारी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद नाही, ही समाधानकारक बाब आहे. याशिवाय होनीवडे (ता. आजरा), मरळी, चव्हाणवाडी, नवे पारगाव (ता. पन्हाळा), कळंबा (ता. करवीर), कबनूर, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), मुरगूड (ता. कागल), दानोळी (ता. शिरोळ), माजगाव, पंडेवाडी (ता. राधानगरी), कनाकवाडी (ता. भुदरगड), यशवंतनगर (ता. चंदगड), मुगळी, लिंगनूर (ता. गडहिंग्लज), मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा), निपाणी, कुरारगाव (कर्नाटक).

जिल्ह्याचा आढावा...

  • पॉझिटिव्ह रेट - २४.०७
  • ॲक्टिव्ह केस रेट- २९.५७
  • रिकव्हरी रेट - ६७.३
  • मृत्यू रेट - ३.१
  • संपर्क ट्रेसिंग रेट-७.७०
  • टोटल टेस्ट- १४९८५६

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तालुकानिहाय 
आजरा - ६५२, भुदरगड - ८४०, चंदगड - ७८७, गडहिंग्लज- ८६९, गगनबावडा - १०२, हातकणंगले - ४१७४, कागल - १२७९, करवीर - ४११४, पन्हाळा -१३६४, राधानगरी - १००३, शाहूवाडी - ९००, शिरोळ - १९९५, नगरपालिका - ५८४३, कोल्हापूर शहर - ११४८६, इतर जिल्हे व राज्य- ३७.

  • एकूण रुग्ण ३६६५५, एकूण मृत्यू ११४४

 

Web Title: corona virus: comforting; The number of patients in the district is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.