corona virus : कोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:33 AM2020-10-29T11:33:38+5:302020-10-29T11:37:18+5:30

Coronavirus, CPR Hospital, kolhapur गेल्या पाच दिवसांमध्ये रोज कोरोनाच्या संंख्येमध्ये अत्यल्प प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही संख्या अतिशय कमी असली तरीदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

corona virus: daily increase in the number of corona patients, only one death | corona virus : कोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यू

corona virus : कोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यूनागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांमध्ये रोज कोरोनाच्या संंख्येमध्ये अत्यल्प प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही संख्या अतिशय कमी असली तरीदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

गेल्या २४ तासांमध्ये नवे ६८ रुग्ण आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या केवळ १०३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरामध्ये ३७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४०६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत तर १६४ जणांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे. एकूण मृतांचा आकडा १६३७ झाला आहे.

तालुका रुग्णसंख्या

  • आजरा ८४२
  • भुदरगड १२०४
  • चंदगड ११६५
  • गडहिंग्लज १३९१
  • गगनबावडा १४०
  • हातकणंगले ५२०५
  • कागल १६३०
  • करवीर ५५२०
  • पन्हाळा १८३१
  • राधानगरी १२११
  • शाहूवाडी १३०६
  • शिरोळ २४४८
  • नगरपालिका ७३१५

कोल्हापूर
-महापालिका १४५४५
=इतर जिल्हे २२०८
-एकूण रुग्ण ४७९६१
-एकूण मृत्यू १६३७

दिनांक       पॉझिटिव्ह रुग्ण

  • २४ ऑक्टोबर     ३४
  • २५ ऑक्टोबर     ३५
  • २६ ऑक्टोबर    ५५
  • २७ ऑक्टोबर    ६१
  • २८ ऑक्टोबर    ६८

Web Title: corona virus: daily increase in the number of corona patients, only one death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.