corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:15 PM2020-07-06T17:15:50+5:302020-07-06T17:20:08+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, इचलकरंजी आणि चंदगड तालुक्यांतील वाढता समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

corona virus: Danger increased in Ichalkaranji, Chandgad | corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला

corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला

Next
ठळक मुद्देइचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढलासमूह संसर्गाचा धोका वाढला : नवे २४ रुग्ण दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, इचलकरंजी आणि चंदगड तालुक्यांतील वाढता समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ४०० चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांमध्ये ३६४ अहवाल निगेटिव्ह आले, तर २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; शिवाय गडहिंग्लज तालुक्यातील सहा व्यक्तींचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रात्री उशिरा दुसऱ्या टप्प्यात इचलकरंजीत कलानगरमध्ये ४५ वर्षीय पुरुष, तर महात्मा गांधी हौसिंग सोसायटीमध्ये ३३ वर्षीय महिला असे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले.

रविवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या २४ पॉझिटिव्ह चाचणी अहवालांमध्ये इचलकरंजीमध्ये नऊ, चंदगड तालुक्यातील सहा रुग्ण आढळले. त्यामध्ये मोऱ्याचीवाडी- दोन, केरिवडे, शेणोली, शिनोळी, कन्नुर बुद्रुक येथे प्रत्येकी एक रुग्ण, शिरोळ तालुक्यात नांदणी येथे दोन, राधानगरी तालुक्यात ठिकपुर्ली व फेजीवडे येथे प्रत्येकी एक, याशिवाय वडगाव शहर, जयसिंगपूर शहर, भुयेवाडी (ता. करवीर), तुप्परवाडी (ता. गडहिंग्लज), कोरोची (ता. हातकणंगले) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. दिवसभरात चार रुग्णांचा डिस्चार्ज दिला.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९६५ रुग्णसंख्या झाली असून ७४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत फक्त २०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वडगाव नगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रवेश

कोरोना महामारीचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर सुरू आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत सर्व तालुक्यांत व सर्व नगरपालिका हद्दींत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. फक्त वडगाव व पन्हाळा नगरपालिका हद्दीत कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आले होते; पण रविवारी कोरोना विषाणूने वडगाव नगरपालिका हद्दीतही प्रवेश केला. लाटवडे रोडवरील पेठवडगावमध्ये एका ३७ वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वडगाव नगरपालिका प्रशासन हादरले आहे.

जूनमध्ये डिस्चार्ज, जुलैमध्ये रुग्णवाढ

कोल्हापूर जिल्ह्यात मार्चअखेर, एप्रिल, मे महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. तसे संपूर्ण जून महिन्यात नवे रुग्ण कमी दाखल झाले; पण उपचाराअंती डिस्चार्ज घेऊन घरी जाणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने प्रशासन समाधानी होते; पण जुलै महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन पुन्हा चिंताग्रस्त बनले आहे.

तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या :

आजरा - ८७, भुदरगड- ७६, चंदगड- १११, गडहिंग्लज- ११०, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३०, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- १२, कोल्हापूर महापालिका हद्द- ५९, नगरपालिका- ८८ (इचलकरंजी- ६६, जयसिंगपूर- ५, कुरुंदवाड- ९, गडहिंग्लज- ३, कागल- १, शिरोळ- २, हुपरी- १, पेठवडगाव १), जिल्हे व राज्य (सातारा २, पुणे २, सोलापूर ३, मुंबई ४, नाशिक १, कर्नाटक ७, आंध्रप्रदेश १)- २०. एकूण रुग्णसंख्या- ९६५.
 

Web Title: corona virus: Danger increased in Ichalkaranji, Chandgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.