कोरोना विषाणू नष्ट करणारे मशीन; सीपीआर, जिल्हा परिषदेत बसविण्यात येणार ‘सायटेक एअर आॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:30 PM2020-04-17T12:30:36+5:302020-04-17T12:33:34+5:30
पुणे येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राने ‘सायटेक एअर आॅन’ हे मशीन तयार केले आहे. त्याच्या वापरामुळे कोरोनासह अन्य चार विषाणू नष्ट होण्यास मदत होत असल्याचा दावा केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ‘आपदा मित्र निधी’मधून २५ मशीन खरेदी केली आहेत.
कोल्हापूर : ‘सायटेक एअर आॅन’ या मशीनच्या माध्यमातून साधारणत: ३०० फूट परिघामध्ये हवेत असणारे कोरोनाचे विषाणू नष्ट केले जातात. हे मशीन सध्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या कक्षामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. सीपीआर रुग्णालय, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद येथे संबंधित मशीन बसविण्यात येणार आहेत.
पुणे येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राने ‘सायटेक एअर आॅन’ हे मशीन तयार केले आहे. त्याच्या वापरामुळे कोरोनासह अन्य चार विषाणू नष्ट होण्यास मदत होत असल्याचा दावा केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ‘आपदा मित्र निधी’मधून २५ मशीन खरेदी केली आहेत. हे मशीन जेथे लावले जाईल तेथील ३०० फूट परिसरातील हवेचे शुद्धीकरण होते. त्यासह बाह्य आवारामधील विषाणू नष्ट होतात, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.