corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:10 PM2020-08-24T20:10:41+5:302020-08-24T20:11:58+5:30

केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

corona virus: E-pass is mandatory till the state government gives instructions | corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

Next
ठळक मुद्देराज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेचई-पास मागणीच्या अर्जात घट

कोल्हापूर : केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत रविवारी केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-पास सेवा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी त्याबाबतचा निर्णय ज्या-त्या राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे, त्याचे सर्वाधिकारी राज्य शासनाने असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीत ई -पासचा निर्णय महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.

सध्या हे ई-पास जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने अजूनही कोल्हापूरकर तसेच राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत. सध्या ई-पास मागणीच्या अर्जात घट झाली असून दिवसाला सरासरी दीड हजारांवर अर्ज येत आहेत तर प्रलंबित अर्जांची संख्या केवळ पाचशे इतकी आहे.


ई-पासबाबत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सक्तीचे आहे. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही होईल.
रंजना बिचकर,
ई -पास वितरण मुख्य अधिकारी

Web Title: corona virus: E-pass is mandatory till the state government gives instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.