corona virus : कोरोनामुक्त रुग्णाला होम क्वारंटाईनसाठी दिला फ्लॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:57 PM2020-07-27T17:57:07+5:302020-07-27T18:15:37+5:30
कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णाला अपार्टमेंटमध्ये रिकामा असलेला फ्लॅट होम क्वारंटाईनसाठी देऊन ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.
कोल्हापूर : कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णाला अपार्टमेंटमध्ये रिकामा असलेला फ्लॅट होम क्वारंटाईनसाठी देऊन ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.
ब्रह्मेश्वर रेसिडेन्सी येथील एक तरुणाला आठ दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्याला शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर रीतसर अपार्टमेंट सील करण्यात आली.
कोरोनामुक्त झाल्यानंतर तो तरुण सोमवारी घरी परतल्यावर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्याचे स्वागत केले. केवळ स्वागत करून न थांबता एकाने त्याला आपला रिकामा फ्लॅट होम क्वारंटाईन होण्यासाठी दिला. सुरेश देसाई, गणेश घोडके, रोहीत साळोखे, उदय जाधव, मणिलाल शहा, डॉ. निलेश कादवेकर यांच्या पुढाकाराने आणि अन्य सर्व राहिवासीयांच्या सहकार्यानेच ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.
ब्रह्मेश्वर रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी कोरोनामुक्त रुग्णाचे स्वागत केले, ते पाहून सगळा परिसरच सद्गदित झाला.आज कोल्हापूरला एक अत्यंत सकारात्मक उदाहरण रहिवाशांनी दिले. सम्पूर्ण कोल्हापूर शहरातील अपार्टमेंट्सनी हा कित्ता गिरविणे ही काळाची गरज आहे. शेजारील पिनाक शिवालय अपार्टमेंटनेही तेथील मोकळे फ्लॅट, सोसायटीत दुर्दैवाने कुणाला क्वारान्टीन करायला लागला तर त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय करून प्रभागाची मान उंचावली आहे.
-अजित ठाणेकर,
नगरसेवक, कोल्हापूर