corona virus : अलगीकरणासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:42 AM2020-07-23T11:42:20+5:302020-07-23T11:48:22+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. सरकारी आरोग्य संस्थेत असे घडणारे प्रसंग हे प्रशासनाचे अपयश असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. महिला रुग्णांना योग्य उपचार आणि सुरक्षा देताना सरकारी यंत्रणेने अधिक दक्ष राहावे. महिला रुग्णांना सुरक्षित आणि पोलीस महिला अधिकाऱ्यांया देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा व अलगीकरण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.