corona virus : कोरोनासाठी खासगी दवाखान्याना शासनाकडून औषध पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:23 PM2020-07-27T12:23:36+5:302020-07-27T12:24:41+5:30
खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे.
कोल्हापूर: खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे.
शहरातील खासगी रूग्णालयांच्या डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आपत्ती व्यवस्थापन समिती प्राधिकरण समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. आमदार चंद्रकांत जाधव व्ही.सी.द्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, उपचारासाठी रूग्णांना फिरायला लागणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. सी.पी.आर. मध्ये खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहेत. सध्याची वेळ वेगळी आहे. ती लक्षात घेवून सर्व रूग्णालयांनी शासनाच्या निर्देशानुसार बेड आरक्षित ठेवून रूग्णांवर उपचार करावेत.
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, खासगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांला तात्काळ दाखल करून त्याच्यावर डॉक्टरने उपचार करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची आहे. तक्रारी येवू नयेत यासाठी नियोजन आवश्यक आहे.
दर आकारणीचे फलक लावावेत
खासगी रूग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या दर आकारणीबाबतचे फलक लावावेत, अशी सूचना डॉ. कलशेट्टी व आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.