CoronaVirus Lockdown : २० रेल्वेमधून कोल्हापुरातून आजअखेर २७,३७७ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:03 PM2020-05-21T15:03:52+5:302020-05-21T15:07:13+5:30

आजअखेर एकूण २० रेल्वेमधून २७ हजार ३७७ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील १४०१ मजुरांना घेवून आज दुपारी १ वा बिहारमधील अरारियाकडे रेल्वे रवाना झाली.

Corona Virus Lockdown: 27,377 workers sent out of Kolhapur today | CoronaVirus Lockdown : २० रेल्वेमधून कोल्हापुरातून आजअखेर २७,३७७ मजूर रवाना

CoronaVirus Lockdown : २० रेल्वेमधून कोल्हापुरातून आजअखेर २७,३७७ मजूर रवाना

Next
ठळक मुद्देसर्वाधिक मजूर १३ हजार ५५२ उत्तर प्रदेशमधील२० रेल्वेमधून मजूर मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना

कोल्हापूर - आजअखेर एकूण २० रेल्वेमधून २७ हजार ३७७ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील १४०१ मजुरांना घेवून आज दुपारी १ वा बिहारमधील अरारियाकडे रेल्वे रवाना झाली.

यावेळी युवराज गवळी, आदित्य कांबळे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पथकासह डॉ. महादेव नरके, भरत रसाळे, आनंदा करपे, सागर पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण २७,३७७ रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ९ हजार ८२२, मध्यप्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६ आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.

Web Title: Corona Virus Lockdown: 27,377 workers sent out of Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.