corona virus : ऐंशीतील महाडिक झाले ठणठणीत बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 08:34 PM2020-09-04T20:34:53+5:302020-09-04T20:36:08+5:30
वयाची ऐंशी पार केलेले आणि तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक नुकतेच कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा काही काळ थांबलेला दिनक्रम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला. महाडिक यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले तसे त्यांचे समर्थक काहीसे चिंतेत होते; पण जबरदस्त महत्त्वाकांक्षी असलेल्या महाडिकांनी कोरोनालाही चितपट केले.
कोल्हापूर : वयाची ऐंशी पार केलेले आणि तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक नुकतेच कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा काही काळ थांबलेला दिनक्रम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला. महाडिक यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले तसे त्यांचे समर्थक काहीसे चिंतेत होते; पण जबरदस्त महत्त्वाकांक्षी असलेल्या महाडिकांनी कोरोनालाही चितपट केले.
महाडिक मूळचे पैलवान असल्यामुळे तब्येतीच्या बाबतीत अतिशय सजग आहेत. वेळच्या वेळी जेवण, विश्रांती, व्यायाम यांचे सर्व वेळापत्रक आजही ते तंतोतंत पाळत असतात. कोरोनाच्या महामारीत त्यांना कोरोनाची लागण झाली, तसेच त्यांचे समर्थक काहीसे अस्वस्थ झाले; पण महाडिक यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार पुरेशी काळजी घेत कोरोनालाही पिटाळून लावले. राजकारणात अनेक लढाया जिंकणाऱ्या महाडिक यांनी कोरोनाविरुद्धचीही लढाई सहज जिंकली.
कोरोनाच्या काळात त्यांचे वास्तव्य घरातच होते. त्यांनी खाण्याच्याबाबतीत नेहमीप्रमाणे वेळा पाळण्याचा प्रयत्न केला. नियमित व्यायाम केला. पूर्ण झोप घेतली. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव मनावर न आणता सकारात्मक विचार करत मन प्रसन्न राहील याकडे विशेष लक्ष दिले. वृत्तपत्रांचे वाचन केले. घड्याळाच्या काट्यावर जीवन जगणाऱ्या महाडिकांनी कोरोनाच्या काळातही वेळेला महत्त्व दिले. व्यवसाय, कारखाना याकडेही त्यांचे लक्ष राहिले.
महाडिक सहीसलामत
कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता, ह्यकायच झालं नाही हो महाडिकांना, थोडी उजळणी झाली. महाडिक सहीसलामत आहेत,ह्ण असे प्रतिक्रिया दिली. ह्यकोल्हापूरकरांनी महाडिकांवर भरभरून प्रेम केले, त्यांची पुण्याई माझ्या पाठीशी आहे. या उतराईतून होण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. लोकांना दवाखान्यात जायला पैसे नाहीत, औषधे घ्यायला पैसे नाहीत, इतक्या वाईट परिस्थितीतून जात आहेत; त्यामुळे माझे मदतकार्य सुरूच आहे. भविष्यातही ते सुरू राहील,ह्ण असे त्यांनी सांगितले.
- असा आहे महाडिकांचा आहार
महाडिक सकाळी आठ वाजता जेवले की रात्री आठ वाजताच जेवतात. चहा गुळाचा घेतात. सकाळच्या जेवणात चार उकडलेली अंडी (पिवळे काढून) एक पेंढी मेथीची भाजी, भाकरी, भात, एक वाटी लोणी. रात्री एकदम हलके जेवण, त्यामध्ये थोडीशीच भाकरी, भात इत्यादींचा समावेश असतो. रोज सकाळी धावणे हा ठरलेला व्यायाम महाडिक करतात. योगासनेही करतात. या वयात एकही दिवस त्यांच्या व्यायामात खंड पडलेला नाही.