corona virus - गडहिंग्लज विभागातील मुख्य मार्गही केले बंद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 06:47 PM2020-03-24T18:47:57+5:302020-03-24T18:50:14+5:30
जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली.संचारबंदीच्या काळातही प्रवास करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.
ठळक मुद्देगडहिंग्लज विभागातील मुख्य मार्गही केले बंद...!गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांचा संपर्क तुटला
गडहिंग्लज : जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली.संचारबंदीच्या काळातही प्रवास करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.
- गडहिंग्लज शहरातील भीमनगर, राजेंद्र प्रसाद रोड,पाटणे गल्ली व शिवाजी चौक याठिकाणी नागरिकांनी रस्ते बंद केले आहेत.
- नेसरी : नेसरी ग्रामस्थांनी वीरशैव मठ, सात बंगला वसाहत व कानडेवाडी वेस याठिकाणी रस्ते बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे लाऊडस्पीकरवरून ग्रामस्थांना आरोग्यविषयक सूचना देण्यात येत आहेत.
- नूल : नूल परिसरात निलजी, मुगळी, तनवडी, रामपुरवाडी खणदाळ याठिकाणी नाकाबंदी करून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
- मुंबई पुण्यावरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात येत आहे.
- हसुरचंपू ग्रामस्थांनी दुंडगे, मादयाळ, हेब्बाळ, कोणकेरी आणि सोलापूर या गावांकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत.
- गडहिंग्लज - संकेश्वर मार्गावरील हिटणी,मुत्नाळ,निलजी,हेब्बाळ , दुंडगे व औरनाळ या गावातील प्रवेश रोखण्यात आला आहे.
- महागाव : महागाव परिसरातील गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील हरळी बुद्रुक, हरळी खुर्द,इंचनाळ आणि
- हुनगिनहाळ या गावात जाणारे रस्ते ग्रामस्थांनी फाट्यावरच बंद केले आहेत.
परदेशातून आलेल्या १५ जणांना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तसेच मुंबई , बंगळूर,पुणे अशा शहरातून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांनाही आपापल्या घरात स्वतंत्र राहण्यासंदर्भात बजावण्यात येत आहे.