corona virus : पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:41 PM2020-09-28T16:41:03+5:302020-09-28T16:44:23+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.
पन्हाळा : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.
राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोव्हीड रुग्णांचे वेळेवर निदान होऊन त्यांच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी मोहिमेत सर्वे करणाऱ्यांना खरी माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी खारगे यांनी केले
पन्हाळा शहरात विविध लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे, व्यापारी यांच्या सहकार्याने प्रत्येक घरात माणसी एक साबण व एक मास्क वितरित करण्यात येत आहे. शहरात जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने, कार्यालये व प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारावर नो मास्क- नो एन्ट्रीचे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत.
सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या पथकसोबत सर्वे करत योग्य त्या सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, उपाध्यक्ष चैतन्य भोसले, माजी उपाध्यक्ष रवींद्र धडेल, बांधकाम सभापती सुरेखा भोसले, नगरसेविका पल्लवी नायकवडी, सुरेखा पर्वतगोसावी, नगरसेवक सुरेश कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.