corona virus -बँक कर्मचाऱ्यांचे मास्क, हँडग्लोज लावूनच काम, काही बँकेत रांगा लावून प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:26 PM2020-03-19T16:26:43+5:302020-03-19T16:27:59+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेतील कर्मचारी मास्क, हँडग्लोज लावूनच काम करत आहेत. काही बँकांमध्ये तर ग्राहकांना सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे.
कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेतील कर्मचारी मास्क, हँडग्लोज लावूनच काम करत आहेत. काही बँकांमध्ये तर ग्राहकांना सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे.
मुंबई, पुण्यानंतर आता रत्नागिरीमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीती आणखीन वाढली आहे. तोंडाला मास्क अथवा रुमाल लावूनच नागरिक घरातून बाहेर पडत असल्याचे दिसत आहेत.
पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी बँकांमध्ये जावे लागते. सर्वच बँकेत गर्दी असते. या पार्श्वभूमीवर बँकांनी ग्राहकांबरोबरच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे. काही बँकांनी कर्मचाऱ्यांना मास्क व हँडग्लोज दिले आहेत. असे असले तरी काही बँकांमध्ये मात्र अद्यापही मास्क दिलेले नाहीत.