corona virus : नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:33 PM2020-10-05T13:33:42+5:302020-10-05T13:36:18+5:30

CoronaVirus, kolhapur news, cprhospital कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नव्या रुग्णांपेक्षा उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आधिक दिसून आली.

corona virus: more cured than new patients | corona virus : नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

corona virus : नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देनवे रुग्ण २४० : दिवसभरात डिसचार्ज ३७७ रुग्णसंख्या वाढ घसरली

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नव्या रुग्णांपेक्षा उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आधिक दिसून आली. त्यामुळे दिवसभरात नव्या २४० रुग्णांची भर पडली तर ३७७ रुग्णांना डिसचार्ज दिला. डिसचार्ज दिलेल्यांची एकूण संख्या ३५,६०३ झाली. सद्यस्थितीत ८५०३ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

रविवारी चोवीस तासात आजरा, शाहुवाडी तालुक्यात प्रत्येकी एक, शिरोळमध्ये दोन, राधानगरीमध्ये तीन, पन्हाळ्यात चार, गडहिंग्लजमध्ये सहा नव्या रुग्णांची नोंद झाली, गगणबावडा तालुक्यात एकही रुग्ण वाढला नाही हे दिलासादायक चित्र आहे.

भुदरगडमध्ये १४, चंदगडमध्ये १२, हातकणंगलेमध्ये २२, कागलमध्ये १०, करवीरमध्ये ४६ तर कोल्हापूर शहरात ७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झपाट्याने वाढलेल रुग्णसंख्या ही पंधरा दिवसात तितक्याच झपाट्याने खाली आली आहे. त्यामुळे नव्या रुग्णसंख्या वाढीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. दिवसभरात दहा जणाचा मृत्यू झाल्याने मृत्यूसंख्या १४८९ वर पोहचली आहे.

नव्या चाचण्या घटल्या...

दिवसभरात प्राप्त ७०० आरटीपीसीआर चाचण्याच्या अहवालापैकी १०१ पॉझिटिव्ह आले तर ५९४ अहवाल निगेटिव्ह आले. २५७ ॲन्टीजेन चाचण्यापैकी ३२ पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर खासगी रुग्णालयातून १०७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

दहा जणांचा मृत्यू; कोल्हापूर शहरात निरंक

गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरात एकाही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला नाही. तर जिल्ह्यात पाच पुरुष व पाच महिलांचा मृत्यू झाला. त्यामध्ये राजापूरवाडी (ता. शिरोळ), एकता नगर (कागल), हळदी (ता. कागल), वळीवडे (ता. करवीर), संभापूर (ता. हातकणंगले), इचलकरंजी, नेज, चावरे (ता. हातकणंगले), कवळकट्टी (ता. चंदगड), पन्हाळा (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे.

  • नवे रुग्ण वाढ-२४० (एकूण रुग्णसंख्या :४५५९५)
  •  दिवसभरात डिसचार्ज - ३७७ (एकूण डिसचार्ज : ३५६०३)
  • दिवसभरात मृत्यू - १० (एकूण मृत्यू : १४८९)
  • सद्यस्थितीत उपचार सुरु - ८५०३
     

तालुकानिहाय संख्या...

आजरा- ७९९, भुदरगड- ११३९, चंदगड- १०६५, गडहिंग्लज- १२९७, गगनबावडा-१३०, हातकणंगले- ४९९३, कागल - १५६६, करवीर- ५३०३, पन्हाळा- १७५५, राधानगरी- ११८२, शाहूवाडी- १२१६, शिरोळ- २३५३, नगरपालिका- ७००४, कोल्हापूर शहर- १३८०४, इतर जिल्हे / राज्य-१९८९ (एकूण रुग्णसंख्या- ४५५९५, मृत्यू- १४८९)

Web Title: corona virus: more cured than new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.