corona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:56 PM2020-09-14T18:56:44+5:302020-09-14T18:58:56+5:30

रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड‌्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून लवकरच कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.

corona virus: Movement against spitting started in the city | corona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू

corona virus : थुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरू

Next
ठळक मुद्देथुंकण्याविरोधात शहरात चळवळ सुरूविविध उपक्रमांच्या माध्यमातून होणार जनजागरण

कोल्हापूर : रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड‌्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून लवकरच कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.

शिपूरकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून थुंकण्याविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांना त्यांनी जागेवरच जाब विचारण्यास सुरुवात केली होती. त्यांचे फोटोही समाजमाध्यमावर त्यांनी प्रसारित केले होते. यातूनच त्यांना ह्यथुंकण्याविरोधात चळवळह्ण ही कल्पना सुचली.

यासाठी त्यांनी व्हॉट‌्स ॲप ग्रुप तयार केला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यामध्ये यासाठी आता कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. या अंतर्गत गुटखाविक्रीची माहिती देणे, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, शहरातील सीसीटीव्हींचा वापर करून थुंकणाऱ्यांना नोटिसा काढण्याबाबत आग्रह धरणे, मास्क नसल्याने जसा दंड होतो तसा थुंकल्याबद्दल दंड करणे, हॉटस्पॉटवर जास्त लक्ष केंद्रित करणे, शहरातील होर्डिंगवरून जनजागरण करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 

 


ही एक चांगली चळवळ कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. अशा चळवळीची गरज या कोरोनाच्या काळात अधोरेखित झाली आहे. आपण तंबाखू, गुटखा, पान खाऊन थुंकतो आणि परिसर गलिच्छ करतो, याचे भान नागरिकांना नसते. सुशिक्षितही यामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे हे काम सोपे नाही. तरीही चळवळीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये थुंकण्याविरोधात वातावरण तयार करण्यात यश येईल, असा मला विश्वास आहे.
- सुरेश शिपूरकर,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Web Title: corona virus: Movement against spitting started in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.