corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:16 PM2020-07-21T12:16:14+5:302020-07-21T12:22:47+5:30

घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.

corona virus: No need to be afraid, just be careful | corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

Next
ठळक मुद्देगरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायचीआवश्यक तेवढे खा, मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक रहा

समीर देशपांडे

कोल्हापूर : घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाहेर पडणार आहे. घाबरायचं नाही, प्रत्येकामध्ये एक योद्धा दडलेला असतो. त्याला जागं करायचं आणि लढाई सुरू करायची. लक्ष्य एकच फक्त आपल्याला जिंकायचंय.

कोरोना झाल्यामुळे लगेच प्रचंड त्रास होतो असे काहीही नाही. माझ्यासह जे २० पाझिटिव्ह रुग्ण होते, त्यातील आम्ही १५ जण दोन दिवसांतच ठणठणीत झालो. फक्त सुरुवातीला थोडा ताप, घशात खवखव आणि थोडा खोकला अशी लक्षणे असतात. तिथे एकदा औषधे सुरू केली की ही लक्षणेही नाहीशी होतात. फक्त त्यानंतर आठ दिवस तुम्ही सकारात्मक पद्धतीने राहण्याची एक सवय लावून घेण्याची गरज आहे. तेथील सुविधा, गैरसोयी याबाबतीत नकारात्मक विचार न करता हे सर्व डाक्टर्स आणि स्टाफ मला बरे करण्यासाठी राबत आहे याची जाणीव ठेवायची. बाकी सगळं बाजूला ठेवायचं आणि आपली तब्येत ठाकठीक कशी राहील याकडे लक्ष द्यायचं.

प्रत्येक फोन घेण्याची गरज नाही

आपण रुग्णालयात दाखल होण्याआधीपासून नातेवाईक, गल्लीतील शेजारी, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्या फोनचा मारा सुरू होतो. अशावेळी आपल्याला जेवढे अतिगरजेचे आहेत, तेवढेच फोन घ्या. सगळ्यांनीच काळजी वाटूनच फोन केलेला असतो. धीर देण्यासाठीच फोन केलेला असतो. हे समजून घेऊन प्रत्येकाचा फोन घेण्यापेक्षा केवळ अत्यावश्यक फोन घ्या. प्रत्येकाला आपण कुठे फिरत होतो आणि मला कोरोना कसा झाला कळलेच नाही हा इतिहास सांगत बसण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या घशावर ताण येतो. जो हिताचा नसतो. मी असे शेकडो फोन घेणे टाळले. नंतर त्यांची दिलगिरीही व्यक्त केली. परंतु त्याचा मला फायदा झाला.

मोबाईल सायलेंट करा आणि झोपा

आपण पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्यामुळे आणखी कितीजणांना लागण झाली आहे याची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून लगेच समजायला लागते. अशावेळी आपण मानसिकरीत्या शांत राहण्याची गरज आहे. आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने तुम्हाला शांतपणे झोप लागण्याची गरज आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा.


चमचमीत पदार्थ टाळा

चवीत बदल म्हणून पाहुणे, घरचे घरातून डबा देतात; पण अनेकदा त्यामध्ये पथ्य पाळले जात नाही. मसालेदार अंडा करीपासून ते तेलाने थपथपलेल्या अंडा आम्लेटपर्यंतचे जेवण पाठविले जाते. परंतु ते आरोग्यासाठी फारसे हिताचे नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी तुम्हाला डाक्टर तुमचा डबा बघून काय खावा, काय खाऊ नका सांगायला येणार नाहीत. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. उकडलेली अंडी, फळे दिली जातात. ती आवर्जून खावा; पण तिथल्या जेवणातून आलेले दही अगदीच आंबट असेल, लोणचेही आंबट असेल तर सगळ्यांचा चवीपुरताच आस्वाद घ्या. आपला घसा या सगळ्याला कसा प्रतिसाद देईल याचा विचार करून आंबट, तेलकट, तिखट खाणे टाळण्याची गरज आहे.

गरम पाणी प्या

सर्वांकडेच गरम पाणी करण्याची किटली जरी नसली, तरी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून सकाळी, सायंकाळी एक एक ग्लास गरम पाणी मागून घ्या. अशावेळी कुणी नाही म्हणत नाही. आपल्या घशाला सोसेल अशा पद्धतीने गरम किंवा कोमट पाणी प्या.


गोळ्या चुकवू नका

आपण तेथे दाखल झाल्यानंतर तेथे आपल्यावर उपचार सुरू होतात. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, रक्तदाब आहे, मधुमेह आहे अशांकडे विशेष लक्ष दिले जाते. इतरांना गोळ्या दिल्या जातात. गोळ्यांची संख्या सकाळी ५/६, सायंकाळी ५/६ असते. मात्र, गोळ्या घेणे टाळू नका. सांगितल्यानुसार जेवणाआधी आणि नंतर गोळ्या घ्या.

 

Web Title: corona virus: No need to be afraid, just be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.